आठवण
आठवण
आलास तसा निघून गेलासही बाप्पा
करायच्या होत्या तुझ्याशी आम्हाला बऱ्याच गप्पा
सांगायचं होत बरच काही, बोलायच ही होत खूप
साठवून घ्यायचं होत डोळ्यात तुझं मनोहारी रूप
पण तू तर गेलास निघून वाजत गाजत तुझ्या घरी
तुझ्या जाण्याने कोमेजून गेली आहे सृष्टी सारी
दहा दिवसांच येणं तुझं मन प्रसन्न करून जात
पण तू जाताना मात्र डोळ्यात पाणी दाटून येत
ओलावतात नेत्रे सारी, भिजतात सारी मनं
साठून राहते तेवढी मनात तुझी आठवण
माहित असत आम्हाला येणारच आहेस पुढल्या साली
पण तोपर्यंत वाटतेच नां सृष्टी सुनी सुनी अन खाली
होतो घराचा कोपरा अन् कोपरा रिकामा
शोधत बसतो मग तुझ्याच घरात आम्ही तुझ्याच पाऊलखुणा
