....आत्महत्या कारतूय....
....आत्महत्या कारतूय....
एक एक पाण्याचा थेंब दुष्काळाने सुकतुय
सहन नाय होत आता सगळं सोडून जातुय,
गोट्यातला बैल आता चाऱ्यासाठी ओरडतुय
पाणी नाय प्यायला लय ग धडपडतोय ,
पाझर गाईच्या दुधाचा हळू हळू अटतुय
चिखलातला बेडूक आता दगडाखाली दडतोय,
पोहलो ज्या नदीत आता तिथं मी चालतुय
जाऊन विचारतो त्या देवाला कारे बा असं करतोय...
आपला पुढारी नुसतीच भाषण ठोकतूय
शेतकऱ्याच्या नावावर स्वतःचीच घरं भरतूय,
आपल्या मालाचा भाव व्यापारी लवतुय
दहातलं नऊ त्याच आपल्या हाताव रुपयाच ठेवःतूय...
सावकारांच्या कर्जांचा नुसता डोंगर होतूय
त्यातच बँकवाला नोटीस पटवतुय,
कामं नाय धंदा नाय नाय, रोज पोट जाळंतुय
माझं सोड पोरांना पण उपाशी मरतुय...
कर्जापाई सावकार जमीनी लूबाड़तूय देवळातला दगड सार नुसतं बगतुय ,
तेचातरी काय दोष, जंगल आपणंच तोडतूय
त्योभी मग दुष्काळ पडून अभद्र घडवतु...
आप्पा म्हणला सरकार, मेल्यावर पैका देतंय
जिवंतपणी नाय जमलं, मरुनमी ते कारतूय,
काळजी घे पोराची, शिकीव त्याला जोपर्यंत त्यो शिकतुय
हुषार हाय पोऱ्या आपला, कलेक्टर हुयाच म्हन्तुय...
शिकुदे त्याला म बग, कसा लाल दिव्यातून फिरतूय
नग करू शेतकरी, मी बग मरेपर्यंत झगड़तुय,
सात जन्माचं हे नातं, एका दोरीनं मी तोडातूय
म्हाताऱ्याला सांभाळ, सगळं तुझ्यावर सोडून जातुय...
रहाल सुखी, ईश्वरचरणी हेच मागणं मगतुय
आत्महत्या कारतूय मी आता आत्महत्या कारतूय.....
आत्महत्या कारतूय मी आता आत्महत्या कारतूय.....
