STORYMIRROR

Dasharath Jadhav

Others

4  

Dasharath Jadhav

Others

आम्हीं मुंबईकर

आम्हीं मुंबईकर

1 min
455

छत्रपतींच्या या महाराष्ट्रात एक अतरंगी हे नगर,

तुमच्या बर्गर ला कुठली आलीये, इथल्या वडापाव ची ती सर..

ऊन वारा वादळ असो, नाहीतर पावसाचा कहर,

थांबेल तर शपत, अहो हेच तर आहे मुंबई शहर...

  उशिराची झोप तरी, उठणं मात्र लवकर,

  घाई असो वा नसो, train साठी नुस्ती मरमर..

  कधी ईद ची मिठाई, तर कधी फटाक्यांचा शोर,

  कुठं गणपतीतला डान्स, तर कुठं गरब्यांचा जोर...

हिंदू मुस्लीम सीख इसाई, सप्तरंगांचा हा बहर,

कुणी असो आणि कुठलाही, राहतात एकोप्याने बरोबर..

जात धर्म इथं नाही, इथं माणुसकी ची कदर,

अरं मुंबई तर माय हाय, सगळ्यांना मायेचं हो पदर...

  भारतीय संस्कृती, जिचा साऱ्या जगाला आदर,

 उगाच नाय साड्या घालून मिरवीत फॉरेनर..

 अरे जिजाऊंचे संस्कार आम्हां, अशी शिवबांची हि पोरं,

 भारतीय संस्कृती जपतो, गर्वानें म्हणतो, मी न्हवे आम्हीं मुंबईकर...

            आम्हीं मुंबईकर... आम्हीं मुंबईकर...                          


Rate this content
Log in