आसवे
आसवे
आसवे तिच्या कष्टामागचे
कधीच नाही दिसायचे
उभी एकटी रस्त्यात
नीरव शांतता वाऱ्यात
वाऱ्याच्या दिशेने उडलं
नशीब काट्यात फसलं
भाकरीची आशा कायम
आशेनं शिकवला संयम
नयनातले पाणी अडवले
पाण्यानें पाणी काढले
आसवांची साथ राहते
नयनांना अबाद ठेवते
निरागस चाल असे
तरीपण भव्य दिसे
खाल्लेल्या खस्ता पचवल्या
आयुष्यास नव्याने जागवल्या