STORYMIRROR

Nishikant Deshpande

Action

3  

Nishikant Deshpande

Action

आसवे गळती किती?

आसवे गळती किती?

1 min
474


दोन पुतळे म्लान त्यांचे चेहरे दिसती किती?

पंचधातू संगमरमर, आसवे गळती किती?


एक गांधी त्यात होते सांगती दुसर्‍यास ते

आपणा केले उभे का? प्रश्न हे छळती किती?


भोवताली मद्य विक्री, मासही विकते इथे

हेच का फळ मम तपाला? भावना सलते किती?


देउळे मशिदी कशाला? भांडती का ना कळे

पाठ माझे अंहिसेचे खिजवती मजला किती?


संसदेमध्ये कशाला टांगली तसवीर हो?

भूल थापा घोषणांची भोवती चलती किती?


लागले आंबेडकरही दु:ख आपुले सांगण्या

खूप पुतळे गाव शहरी, लोक ते बघती किती?


जाहलो मी अडथळा का? वर्दळीमध्ये असा

माखला जातो धुळीने श्वास गुदमरती किती?


व्यर्थ मी जन्मास आलो खूप लवकर वाटते

हार नोटांचे अताशा पाहतो मिळती किती?*


हटवुनी मायावती मज आपुल्या पुतळ्यास ती

चौथरे बांधील, तिजला नेहमी भरती किती?


छेडले पुतळ्यास माझ्या दुर्जनांनी जर कधी

डोंब उसळे दंगलीचा झोपड्या जळती किती?


का मला ठाऊक नाही कोण वापरते मला!

शांत बघतो निर्बलांना धेंड कुरतडती किती?


चल जरासे विठ्ठलासम वीट घे राहू उभे

निर्विकारी शांत असता लोक ते भजती किती?


हे बरे "निशिकांत" केले, राखला छोटेपणा

ना विभूती जाहल्याने यातना टळती किती?





Rate this content
Log in

Similar marathi poem from Action