आशिर्वच गौरीनंदना
आशिर्वच गौरीनंदना
आला आला आला / गणपती आला
सुखानंद झाला / सकलांना (१)
गणेश चतुर्थी / आगमन झाले
नाचाया लागले / भक्तगण (२)
गौरीनंदनाचे / रुप मनोहर
तूच विघ्नहर / गणराया (३)
वदन साजिरे / तेज झळाळते
प्रभा झळकते / मुकुटात (४)
विद्या नि कलांचा / तूच अधिपती
तूच हरविसी / कार्तिकेया (५)
मोदक मधुर / प्रिय विनायका
आनंदाच्या कंदा / अधिदेवा (६)
श्रद्धा हो भक्तांची / पूर्ण मनोमनी
चिंता हरवूनी / कार्यसिद्धी (७)