आशीर्वादाचा स्पर्श
आशीर्वादाचा स्पर्श
मस्त केशरी क्षितीजावर अस्तचलास जाणारा
रवी क्षणभर स्थिरावला
नकळत खूप काही जाता जाता मला
आशीर्वाद देता देता बोलून गेला...
झाडामागून पानांना ओलांडून येणारा हात
मला स्पष्ट उघड्या डोळ्यांना दिसला
शीतल प्रकासमान स्पर्श त्या हाताचा
मला माझ्या डोक्यावर जाणवला...
म्हंटले देवा इतकी माया नको रे करुस
हसतील,नावे ठेवतील आणि नजरही लावतील
तुझ्या माझ्या नात्याला पाहून खरोखरच देवा
ही लबाड माणसं बदनामही करतील...
हे ऐकताच रंग बदलून त्याने
आपला राग लालबुंद होऊन प्रकट केला
जाताना कानात माझ्या दुष्टांना त्या
उद्या भाजून काढतो म्हणून सांगून गेला....
