आशेचं रोपटं
आशेचं रोपटं
आशेच एक रोपटं उगवलं
भेगाळलेल्या जमीनीत
फुल देखील उमललं
आकांक्षांच्या अंतरित
माळरानाचे मग
वेगळेच रूप दिसले
अनंतरंगी रंगूनही
पिवळ्या रंगात हासले
येता जाता वाटसरूचे
मन प्रफुल्लित जाहले
सुकलेल्या रानात
मन आनंदाने नाहले
सोनपिवळा रंग फुलाचा
शोभला काळ्यामातीत
जगण्याच्या जिद्दीला
सलामी दिली मातीत
भेगाळलेल्या मातीत
बीज असे अंकुरले
विपरित परिस्थितीत
आशेचे रंग विखुरले
