STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Romance

3  

Author Sangieta Devkar

Romance

आस...

आस...

1 min
11.5K

तू कधी येतोस हळूवार तर

कधी भन्नाट वाऱ्यावर होऊन स्वार.

येण्याने तुझ्या धूंद होते मी,

आठवणीच्या झुल्यावर मन होते स्वार.

तुझं येणं तसं कधीच नक्की नसतं,

तसंच काहीसं त्याचंही होतं.

मी एकटीच झेलत राहते पावसाचे तुषार,

तो येता येता मग तुझं जाणं होतं. 

चिम्ब चिम्ब तुझ्यात भिजुनसुद्धा मन असे शुष्क का?   

देवून तुला सगळ काही पुन्हा पुन्हा ओंजळ भरते का?    

तेवढाच क्षणभर विसावा तुझ्या सहवासाचा,    

मागे उरुन राहतो स्मृतिगंध,

तुझा आणि पावसाचा.    

पुन्हा वाट पाहायची 

वेड्या तुझ्या बरसण्याची.    

का आस लावून जातो तू माझा असण्याची...!!!        


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance