आस मला
आस मला
झालो असेल आज मी,
जरी पुर्ता अपूर्ण.
तरी आहे माझ्यात,
विश्वास परी पूर्ण.
नका लेखू येथे मला,
कोणी कमी आज.
आस आहे मला उद्याची,
मी,काहीही असो आज.
मला नाही शरम, मला
नाही खेद काही.
माझी स्वप्ने खुप मोठी,
मिळवायचे आहे मला खुप काही.
धडपड माझ्या जीवाची,
नाही कळणार कोणाला.
वरवर दया दाखवून तुम्ही,
येथे हिणवता कोणाला.
