आपण सजवू घरं हजारो......
आपण सजवू घरं हजारो......
आपण सजवू घरं हजारो दिप लावु दारी.
करू झगमगाट आकाशकंदिलाचा.
ऊजळून टाकू पहाट,थाट करू प्रकाशाचा.
आधी दूर करू अंधार एक तरी झोपडीचा.
आपण दारी तोरण लावू, सडा रांगोळी काढू,
सोडू दिपमाळा, करू उत्सवाचा सोहळा अंगणात,
दूर होऊदे अंधार आधी वसलेला मनामनात,
हसू फुलवायला निमित्त होऊ एक तरी कुटुंबात.
आपण करू हौसमौज,दागिने आणि नव्या कपड्यांचे बेत
नव्या वस्तूंचे बांधू घाट.
छोटासा हिस्सा राखुयाच त्यांच्या साठी जे आहेत अनाथ.
निरागस चेहेरयाची चमक लाख दिवयाहून मोठी.
पाहून भेट हास्य पहा ऊमटेल ओठी.
आपण खावू गोडधोड, सजवू फराळाची ताटं,
मिठायांची जव ठेऊ जीभेवर रेंगाळत.
जरा आठवूया त्यांनाही जे पोटभर अन्नाला मुकतात.
घासातला घास देऊन करू भूकेलयाला तृप्त.
बदल घडू दे आता नवे समाजात अजीर्ण होईल इतके नको
कोणा एकिकडे सामान हक्क जगण्याचा असो समाजातील सारयाच घटकाकडे.
तुझा, माझा,तुमचा,आमचा नको उत्सव होवो
सारयाच समाजाचा दिप, पेटतो दिपाने तसा सोहळा होऊ दे एकीचा.
दूर करू अंधार जातीभेदाचा.
वर्ण आणि उच्च नीच भावनांचा, तरच खरया अर्थाने सार्थ होईल सन दिपावलीचा
