STORYMIRROR

Yogini "कृष्णाई"

Romance

3  

Yogini "कृष्णाई"

Romance

आपली भेट

आपली भेट

1 min
229

आपल्या भेटीची मी काय लिहू कहाणी,

तू होतास गप्प अन् मी होते बोलकी बाहुली...


विसरून सारं, ना फूल ना फुलाची पाकळी तू आणलीस,

पुन्हा वरतून मला म्हणालास की तूच काही आणू नको म्हणालीस...


अल्लड प्रेम ते, अन् अल्लड ती वेळ,

कोवळ्या ऋतूने मांडला होता नवा नजरेचा खेळ...


खाणं-पिणं झालं सारं, हितगुजही रंगात आलेलं,

सकाळची सांज केव्हा झाली नाही आम्हाला कळलं...


एकमेकांचे मत जुळून, काळजी सुरू झाली होती,

दोघांची आता एक होऊन, रेशमी गाठ बांधायची चर्चा चालू होती...


दोन लोकांना एकत्र येण्याला कारण लागत नाही,

रेशमी बंधने जुळून यायला वेळ लागत नाही...


जुळवून घेतलंस मला तू, तुझ्या आयुष्याच्या तालात,

माझे गाणे विसरून, मी दंग झाले तुझ्या सुरात...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance