आपले प्रेम
आपले प्रेम


निर्जन एकांत स्थळी भेटी झाल्या
चुंबले अधर मधु मिठी झाल्या
सुखाच्या दुःखाच्या गुज गोष्टी झाल्या
तुझ्या माझ्या प्रेमाच्या कविता झाल्या -१-
फुलांच्या सुगंधी बागा खूप झाल्या
स्वप्नांच्या रंगीत सृष्टी खूष झाल्या
इंद्रधनुच्या कमानी सेतु झाल्या
आपल्या प्रीतीच्या आणाभाका झाल्या -२-