आंतरिक ओळख...
आंतरिक ओळख...
काही केल्या स्वतः ची ओळख पटतच नाही...
मनाच्या तळाशी जाऊन शोधल्यावर सुद्धा
हा प्रश्न कधी सुटतच नाही...
बाह्य जगातून होणारे सततचे आघात
कसे सोडवायचे हे कळतच नाही...
मी कोण आहे हे सत्य मलाच
उमगतच नाही...
आयुष्यातला अंधार कधी मिटतच नाही...
निर्माण झालेली कोडी कधी
सुटतच नाही...
खूप दिवसांची आशा फळाला येतच नाही...
आणि,
काही केल्या स्वतःची ओळख पटतच नाही...
