STORYMIRROR

Devakee Dhokane

Tragedy

4  

Devakee Dhokane

Tragedy

आणखी एक निर्भया

आणखी एक निर्भया

1 min
216

 रोज नव्या एका निर्भयाचा अंत होतो,

 प्रत्येकजण मात्र संत असण्याचा आव आणतो.


 मुलगी शिकवा, मुलगी वाचवा असे

        नारे आपणच देतो,

 आणि पुन्हा त्याच मुलीचा जीव घेतो.


 स्त्री-वर्गाचा सन्मान करा असं फक्त

 कागदावर अन् भाषणात सांगितलं जातं,

 प्रत्यक्षात मात्र स्त्री असण्यावरून सतत

      तिला हिणवलं जातं.


 मूग गिळून गप्प बसण्याचे दिवस

            गेले आता,

 'नारी' शक्ती आता तूच शोध तुझ्या

       कर्तृत्वाच्या वाटा.


 ठेचून काढायला हवे समाजातील

        सगळे साप हे विषारी,

 स्वतःच्या अस्तित्वाच्या लढ्यातून पुन्हा नको

        फिरायला माघारी.


 वासनाधिनतेनं बरबटलेल्या नराधमांपासून

     किती दिवस स्वतःला वाचवायचं ?

 मुलगी ,स्त्री म्हणून सतत हेच दुःख पचवायचं ?


 स्त्रीलाही हक्क आहे जीवन जगण्याचा,

      नवे-नवे स्वप्न बघण्याचा,


 हक्क तिचा हिरावून घेवून समाजातून

       तिला बेदखल करू नका ,

 ज्ञानाचा प्रकाश जरा स्वतःच्याही डोक्यात टाका.


 स्त्रीला एक 'स्त्री' म्हणून नव्हे; तर एक

        'माणूस' म्हणून बघूया,

 कारण, पुन्हा नको आणखी एक निर्भया! 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy