Shivam Madrewar

Romance


3  

Shivam Madrewar

Romance


आणि मला हळुवारपणे ती नजर लावते

आणि मला हळुवारपणे ती नजर लावते

1 min 5 1 min 5

खिडकीतून ती हळूच पाहते,

पडद्यामागेच बसून ती डोकावते,

मी पाहताच खिडकी ती आपटते,

आणि मला हळुवारपणे नजर ती लावते


सायंकाळी गच्चीवरती ती येते,

माझ्या घराकडे पाहतच बसते,

मी येताच वाऱ्यासारखे पळून जाते,

आणि मला हळुवारपणे नजर ती लावते


गल्लीमध्ये चालत चालत माझ्या घराकडे येते,

घराच्या कुंपणातून डोकाऊन पाहते,

मी बाहेर येताच विरुद्ध दिशेला मुख करते,

आणि मला हळुवारपणे ती नजर लावते


माझ्या आईला तासभर बोलत बसते,

माझ्या बहीणीसोबत बाजारात जाते,

मी बोलले तर प्रचंड रागाने पाहते,

आणि मला हळुवारपणे ती नजर लावते


मी काॅलेजला जाताना मागोमाग ती येते,

मी सावकाश चाललो तर रस्ताच बदलते,

वर्गामध्ये पण माझ्या कामाचे कौतुक करते,

आणि मला हळुवारपणे ती नजर लावते


माझ्या सर्व कविता आंतरजालावरती वाचते,

अनामी तेथे खूप कौतुक पण करते,

नाटककारापेक्षा उत्तम नाटक करते,

आणि मला हळुवारपणे ती नजर लावते


Rate this content
Log in

More marathi poem from Shivam Madrewar

Similar marathi poem from Romance