आनाथांची दिपावली
आनाथांची दिपावली
येता सण दिपावली वाहे उत्साहाचे
वारेनवी खरेदी करण्या आले बाजारात सारे
पण पहा अनाथांनानसे तयांना पालक
कोण करेल कौतुककिती निष्पाप बालक
नाही पाहीली आईलाझाली आबाळच
खूप प्रेम स्वरूप आईचेसांगा तुम्हीच हो रुप
दुःख मय तो तिमीरलावुनिया दीप ओळी
उजळवू त्यांची घरेकाढु सुंदर रांगोळी
देता दिवाळी फराळ विलसेल हास्य मुखी
आनंदाने प्रफुल्लितदिसतील सारे सुखी
