STORYMIRROR

Ujwala Dhamdhere

Romance Classics Others

4  

Ujwala Dhamdhere

Romance Classics Others

आली पंचमी पंचमी

आली पंचमी पंचमी

1 min
373

आली पंचमी पंचमी

ओल्या श्रावण सरीत 

इंद्रधनुचा टांगला

झोपाळा घनी नभात


आली पंचमी पंचमी

जाईन मी ग माहेरा

मैत्रीणी सह फुगडी

खेळ रंगेल गहिरा


आली पंचमी पंचमी

झोका चढवू झोकात

आम्ही साऱ्या ग मैत्रीणी

मोती आमुच्या नाकात


आली पंचमी पंचमी

सण हा नागराजाचा

त्याचा मांडला उत्सव

का फक्त एका दिसाचा ?


आली पंचमी पंचमी

शोधू कुठे मी वारुळ ?

पुजा करण्या नागाची

माझ्या मनाचं देऊळ


आली पंचमी पंचमी

घन खाली उतरला

रिमझिमता पाऊस 

तनी मनी पसरला


आली पंचमी पंचमी

मी पोहचले माहेरा

येई साजणाची याद

दूर देशी तो राहिला 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance