STORYMIRROR

Ujwala Dhamdhere

Romance Others

4  

Ujwala Dhamdhere

Romance Others

आली तुझी आठवण

आली तुझी आठवण

1 min
369

आली तुझी आठवण

येता पाऊस पहिला

तुझ्या ओल्या आठवात

पाऊस डोळा वाहिला


रिमझिमत भिजत

तुझ्या सुखाच्या सरीत 

तुझे चिंब ओलेपण

पावसाच्या लहरीत


थेंब थेंब पावसाचा

मी केसात माळला

तुझी सय येता सख्या

डोळा पाऊस दाटला


सर खाली ओघळता

झाले मन सैरभैर

आला सुगंध भुईचा

पसरला मनावर


येरे सख्या परतुनी

दूर देशी तुझा वास

चिंब पावसाचा सख्या

घेऊ सोबती सुवास


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance