निळाई
निळाई
सावळ्या तुझी निळी निळाई
निळ्या घनाशी करी चढाई
धन उतरले होऊन धारा
वसुदेवाच्या डोईवर मारा
वसुदेवाच्या डोळे टोपलीत बाळ
मथुरे होऊन चालला गोकुळी गोपाळ
हरीच्या दर्शनाला यमुना अडली
पुरानेच ती पाया तुझ्या पडली
पाण्याला तिच्या लागतच पाय
झाला उद्धार ती उतरत जाय
यमुनेच्या पाण्यात तुझ्याच ठायी
आली निळाई तुझ्याच पायी
