STORYMIRROR

Ujwala Dhamdhere

Classics Inspirational Others

4  

Ujwala Dhamdhere

Classics Inspirational Others

निवृत्ती म्हणजे

निवृत्ती म्हणजे

1 min
327

निवृत्ती म्हणजे हाती आलेलं 

एक नव कोरं पान

हवं तेच चितार त्यावर

ठेवून त्याचा मान

जुने हिशेब लिहून त्यावर

काय मिळणार सांग?

भुत भविष्याची चिंता सोड

फक्त वर्तमानाला जाग

सहज लिही त्यावर

आवडीचे काही तरी

कदाचित त्यातच भेटेल तुला

तुझ्या मनाची माधुरी

निर्विकार मनाने ओढ त्यावर

उभ्या आडव्या रेषा

फक्त सहज मन गुंतवण्या साठी

ठेवू नको काही आशा

काही शब्द लिही त्यावर

मनाच्या गाभाऱ्यातून

होईल कदाचित एखादे

काव्य मनीचे हातून 

शाळेत काढलेलं पहिलं वाहिलं

निसर्गचित्र आठव

तेवढ्याच भाबडेपणानं ते

स्वतःलाच काढून दाखव

तुझ्या पुरता तो तुझा निसर्ग असेल त्यात रम

कोण काय म्हणेल याचं

बाळगू नकोस गम

चार दोन पानं फुलं काढ

तुझ्या आवडीने सजव पान

हो फक्त तुझ्या आवडीने

फायद्या तोट्याचे विसरून भान 

कारण

कारण

निवृत्ती म्हणजे हाती आलेलं 

एक नव कोरं पान

हवं तेच चितार त्यावर

ठेवून त्याचा मान

  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics