श्रावणसरी
श्रावणसरी
1 min
308
रिमझिम ग नाचत
हासऱ्या श्रावणसरी
लेवून थेंबाचा वाळा
पुन्हा आल्या माझ्या दारी
झाड पानांना छेडीत
आले थेंब निथळत
गवताच्या पातोपाती
साज थेंबाचा चढवत
पाना फुला झुलवत
आला श्रावण भिजत
ऊन हळू डोकावत
सरी संगती खेळत
सरीसरीत भिजण्या
उन्हं खाली उतरली
उन येताच खाली
सर कुठे ग लपली
ऊन-पावसाचा खेळ
असा श्रावणी रंगला
झुला पंचमीचा त्याने
माझ्या अंगणी बांधला
