STORYMIRROR

Ujwala Dhamdhere

Others

2  

Ujwala Dhamdhere

Others

आठवणींचा झुला

आठवणींचा झुला

1 min
59

आठवणींचा झुला मनामध्ये झुलला

हृदयाच्या बागेमध्ये हा वसंत फुलला

मनाच्या गाभारी बालपणीचा सुगंध

आणि त्या सुवासाचा माझ्या मनात छंद

शाळेच्या स्मृतींना देता झटका हलका

आणि त्यांनी केला भलताच हा गलका

एका मागोमाग त्या डोळ्यांसमोर आल्या

मैत्रीणी सवे त्या शाळेत घेऊन गेल्या

शाळेच्या पुस्तकात आठवणी भिजल्या

मोरपीस होऊन पानापानी सजल्या

पानातल्या कविता या अजून मनात

शाळेचा संस्कार हा आजन्म आठवात

आजोळच्या आठवणी ची न्यारीच बात

आठवे आजीचा सुरकुतलेला हात

दटावत मुखी तिने घातला हो घास

मायेच्या वाणीचा परी त्यात रे सुवास

माहेरचा वारा घाली मनी सतत पिंगा

आठवांच्या झुल्याशी त्याचा कायम दंगा

आठवे माऊली तिचा रापलेला हात

संसार कष्टांचा त्यात लपला आलेख

पिलांसाठी केला तीने सर्व परित्याग

लेकरांनाही कुठे त्याचे उरते भान?

माहेर म्हणजे मायेचा किहो आहेर

माय विना शोभिवंत नाही तेहो घर

संसाराच्या आठवांचा परिमळ असा

कंजी अडकला मधुभक्षी भुंगा जसा

नाही सोडवत त्यात अडकत जाय

त्यात फसूनीया त्याचे बलिदान होय

अशा आठवणींच्या झुल्याला नाही अंत

कधी मनी दाटे मोद कधी वाटे खंत

आठवांच्या झुल्याची करामत ही सारी

अनुभवाची शिदोरी जीवन उद्धारी


Rate this content
Log in