STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Action Fantasy Inspirational

3  

Trupti Thorat- Kalse

Action Fantasy Inspirational

आली दिवाळी....

आली दिवाळी....

1 min
265

नक्षत्रांचे देणे धरतीला लाभले

जणू चांदणे भूवरी पसरले

घेऊनी सुख-सौख्याचा वर्षाव

चांदण्या सवे भेटीस आले

आकाश धरतीला 

दिन दिन दिवाळी आली दिवाळी


घेऊनीया लखलखीत साज

सजले प्रत्येक हो दार आज

आकाशकंदील शोभे मधोमध

जणू चंद्राचेच गोजिरे रूप

किती हो सुख 

दिन दिन दिवाळी आली दिवाळी


पशुधन जपुनी दाखवावी

कृतज्ञता आपल्या परंपरेची

सवत्स धेनु पुजुनी राखावी

अभाधीत ही कामधेनू

दिन दिन दिवाळी आली दिवाळी


सण वर्षाचा हर्ष-आनंदाचा 

नाही कुठेच सुखाला तोटा

आरोग्य हाच खरा साठा

धन्वंतरी चा संदेश वाचा

शरीरास संभाळा 

दिन दिन दिवाळी आली दिवाळी


गृहलक्ष्मीचा हात जिथे फिरे

तिथे साक्षात लक्ष्मी वसे

पुजुनी सोनपावली लक्ष्मीस

करू मुलीस सबला-साक्षर

हेच व्रत-कैवल्य 

दिन दिन दिवाळी आली दिवाळी


जसा पती आहे परमेश्वर

औक्षण करूनी पाडव्याला 

मागू अखंड कुंकवाच लेन

त्याच्यासवेच हवे हर सुख

प्रेमाची आरास 

दिन दिन दिवाळी आली दिवाळी


भाऊ माझा पाठीराखा

जिवाभावाचा माझा सखा

उदंड आयुष्य लाभो त्याला

हीच ओवळणी मागते आज

माहेरचे सुख 

दिन दिन दिवाळी आली दिवाळी


येऊनी सगळेजण एकत्र 

करू विनवणी देवास 

सुखी ठेव माझ्या घरदारास

दिव्यांची हो ही आरास

किती सुरेख 

दिन दिन दिवाळी आली दिवाळी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action