आले देवाजीच्या मना
आले देवाजीच्या मना
आले देवाजीच्या मना
तेथे कोणाचे चालेना ||
हरिश्चंद्र ताराराणी
वाहे डोंबाघरी पाणी ||
पांडावांचा सहकारी
राज्यावरोनि केले दुरी ||
तुका म्हणे उगी रहावे
जे जे होईल ते ते पहावे ||
