आकाशकंदील
आकाशकंदील
असलो जरी मी उंचावर
तरी नाते माझे जमिनीशी..
शिकवण ही देत राहतो आकाशकंदील साऱ्यांशी...
मंद तरीही तेजस्वी प्रकाश उधळून देतो आनंद अपार...
विविध रंगी, विविध रुपी तरी दिसतो खूप छान...
चंद्र, चांदण्यासवे दिवाळीत शोभे
घरीदारी हमखास...
जोडीला रांगोळ्या अन् दिव्यांची आरास...
