आई
आई
1 min
212
आई तू माझी सावली
परी आता उरले शब्दची जवळी
तरीही असतेस सदा तू जवळी होतीस
अन राहशीलही निरंतर जवळी
वाटे अजूनही बोलू कितीतरी
परी दिसते प्रतिमा तूझी
अन कळते की हा केवळ भासची
तरीही असतेस सदा तू जवळी
होते व्याकूळ आठवणीनी
झरती अश्रू मग नयनामधुनि
झाली आहे पोकळी निरंतर
परी त्याला आता नाही उत्तर
प्रश्नची उरले सारे आता
निघुनी गेलीस तूही सत्वरी
आता जपणे आठवणींना
हाची आहे एक विसावा
सल जो आहे मनीमानसी
तोही कायम माझ्याजवळी
असतेस सदा तू जवळी
होतीस सदा अन राहशीलही निरंतर
