STORYMIRROR

Shila Ambhure

Fantasy

3  

Shila Ambhure

Fantasy

आकाशाला हात

आकाशाला हात

1 min
581


छोटासाच मुलगा मी

करतो विचार मनी.

घालणार कशी बरे

आकाशाला गवसणी?


चंद्र-सूर्य आकाशात

खाली कसे पाहतात?

चांदण्याही त्यांच्यासवे

तिथं कशा राहतात?


उंच उंच आकाशात

ढग कसे लटकले?

दोऱ्याविना त्यांना

कोणी ते अडकवले?


दूर उंच आभाळात

पाणी आहे कुठे बरे?

टाकी तर दिसते ना

पाऊस पडतो खरे.


प्रश्न असे नाना मला

रोज रोज सतावती.

उंचावरले आकाश

मला बघा खुणावती.


शिडी घेऊन मोठीशी

लावली मग ढगाला.

चांदणी एक तोडून

दाखवली मी जगाला.


तेवढ्यात आली जाग

अंथुरणावर होतो

आले जाम हसायला

 स्वप्न मी बघत होतो.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy