STORYMIRROR

Shila Ambhure

Tragedy

4  

Shila Ambhure

Tragedy

आकांत

आकांत

1 min
134

सुगरण

मादी, नर

खोपा त्यांचा

फांदीवर


खोप्यामंदी

दोन बाळे

करतात 

गोड चाळे


चिमुकली

नवजात

चिवचिव

करतात


पिलां बोले

सुगरण

येते जरा

परतून


तुम्हासाठी

जातो रानी

आणितो रे

चारापाणी


मायबाप

उडे भूर

खोपा आता

मागे दूर


सायंकाळी

आले घरी

पक्षी दोन्ही

फांदीवरी


दिसली ना

पिल्ले छोटी

माय घाली

साद मोठी


घेता शोध

चहुकडे

दिसे खोपा

छिन्न गडे


पिले मृत

पाचोळ्यात

झाडाखाली

चिखलात


मायबाप 

रडतात

कुणी केला

असा घात


आकांताने

रडवेली

आई झाली

अर्धमेली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy