STORYMIRROR

Medha Desai

Tragedy

3  

Medha Desai

Tragedy

आजच्या काळापुढील प्रश्न

आजच्या काळापुढील प्रश्न

1 min
271

माणसाचे संघर्षमय जीवन असल्यावर

प्रश्नांची नुसती सरबत्ती असते

एक ना दोन हजार प्रश्न भेडसावतात

मग काळरात्र डोळ्यापुढे दिसत राहते १


माणसाने वृक्षतोड केल्यावर

पर्यावरण संतुलनच बिघडले

निसर्गाचे चक्रच उलटे फिरल्यावर

महापूर,ओला दुष्काळ कर्दनकाळ ठरले २


पुरूषप्रधान संस्कृती असल्यामुळे

बलात्कार,हुंडाबळी,भृणहत्या वाढले

अंधश्रद्धा,रूढी परंपरांनी तर

समाजावर अधिराज्य करून ठेवले ३


व्यसनाधीनतेने समाजाला पोखरले

जातीभेद,दंगल,दहशतवाद पाचवीला पूजले

दानधर्म,सेवाभाव तर दूरच राहिले

म्हणूनच मायबापांना वृद्धाश्रमात पाठवले ४


नवीन तंत्रज्ञानाने प्रगती झाली खरी

पण तरीही स्वार्थ,मतलब वाढलेला

शिक्षणासाठी अवाढव्य खर्च करून

माणूस पैशाच्या मागे धावत सुटलेला ५


माणूसच सारे प्रश्न निर्माण करतो

आणि स्वतःच त्यात अडकत जातो

सोशल मीडिया,मोबाईलच्या अतिवापरामुळे

मानव जातीचा र्हास होताना दिसतो ६


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy