आज सांगते बाबा
आज सांगते बाबा
बाबा, ऐकताय ना..?
माझ्या मनातली खंत
आज सांगते तुम्हाला
थोडावेळ व्हा तुम्ही संत.....१
तुम्हाला हवं तसे
मी वागत आले
शिक्षण, लग्न सारे
तुमच्याप्रमाणे झाले.....२
पण बाबा माझी आवड
तुम्ही विचारलीच नाही
लग्नाच्यावेळी तरी माझी
पंसती विचारावी की नाही?....३
निमूटपणे चढले मी
बोहरल्यावर तुमच्यासाठी
मनात होता कुणी तरी,
गप्प बसले तुमच्यासाठी.....४
गावंढळ अडाण्या सारखे
वागले मी त्यावेळी
इज्जत मान राखण्या तुमचा
पण शल्य टोचतयं ह्यावेळी.....५
हट्टी करारी स्वभाव मानी
जाणून होते सर्व जनात
आई भाऊ बोलू न शकले
मी खंत ठेवू न शकले मनात......६
