STORYMIRROR

Shivam Madrewar

Abstract Tragedy

3  

Shivam Madrewar

Abstract Tragedy

आज रंगच बेरंग झाले.

आज रंगच बेरंग झाले.

1 min
252

बेसुमार झाडांच्या कत्तली केले,

अनेक मुक्या प्राण्यांना पोरके केले,

पृथ्वीवरची हिरवळ संपुष्टात आणले,

हे पाहुन आज रंगच बेरंग झाले.


जीवनसत्वांसाठी सुर्याला बोलाविले,

कायमचा अंधारच मिटवले,

तांबड्या व जांबळ्या रंगांचे कार्य हरवले,

हे पाहुन आज रंगच बेरंग झाले.


आकाशात मानवनिर्मीत चंद्र सोडले,

नैर्सगिक चंद्राने आत्महत्या केले,

पौर्णिमा-अमावश्येचा प्रश्नच संपले,

हे पाहुन आज रंगच बेरंग झाले.


रसायने वापरुन हिवाळ्यात पाऊस बरसले,

उकडते म्हणुन ऊन्हाळ्यात बर्फाचा वर्षाव केले,

नैर्सगिक ऋतूंच्या चक्राचे नाश झाले,

हे पाहुन आज रंगच बेरंग झाले.


घनदाट ॲमेझॅानचे खोरे मिटवले,

सहारा वाळवंटात वृक्षारोपन केले,

अंटार्क्टिकेचा ओझोन थर संपले,

हे पाहुन आज रंगच बेरंग झाले.


महासागराने काळा रंक धारण केले,

तेव्हापासुन इंद्रधनुष्य सुट्टीवर गेले,

जवळपास सर्व रंगच नाहिसे झाले,

हे पाहुन आज रंगच बेरंग झाले.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract