आज पुन्हा तिच्या आठवणीत भिजावस
आज पुन्हा तिच्या आठवणीत भिजावस
सहजच निवांत बसलेलो एकटक पाहत काहीतरी
विचार करत होतो या वेड्या मानाने तिचा, प्रयत्नार्थी नाहीजरी
त्याच्यानेच मनात आभाळ भरून आल्यासारख वाटतंय
आज पुन्हा तिच्या आठवणीत भिजावस वाटतंय
कसे मांडावे हे विचार माझे मलाच सुचत नाही
मनात माझ्या तिच्यावरील प्रेमाशिवाय काहीच रुजत नाही
त्यांच्याच भावनेच्या ओघात पूर्ण वाहून जावस वाटतंय
आज पुन्हा तिच्या आठवणीत भिजावस वाटतंय
एकट्या वाटणाऱ्या वाटेवर चालत जावस वाटतंय
त्या हळहळणाऱ्या वाऱ्यावर तिचेच नाव कोरावस वाटतंय
तिच्या जाण्याने आयुष्यातून सगळं काही निघून गेल्या सारखा वाटतंय
आज पुन्हा तिच्या आठवणीत भिजावस वाटतंय
सगळं सहजच होत गेला काहीही ना कळता
प्रेमाचे हे बीज मऊ लागले तिला बघता बघता
आणि आज पुन्हा त्याच मधुर लयीत हरवून जवस वाटतंय
खरंच... आज पुन्हा तिच्या आठवणीत भिजावस वाटतंय

