आवड
आवड
स्वप्न जरी असे अधांतरी उघड्या डोळ्यांनी तुलाच पाहीन
तू नसलीस शेजारी तरी नेहमी सोबत मात्र मीच राहीन...
नतमस्तक तो सूर्य देखील झाला तुझ्या तेजाला पाहून
मी सगळं पाहत बसलो निपुण अबोल राहून..
का तर माझ्या कर्णकर्कश वाणी ने व्हायचा तुला त्रास
तुला नक्की काय हवाय याचा नव्हता मला रास..
बोलण्याची संधी मिळते मजला
का कुठे तो धीर जाई
बोलण्यास मी आतुर इतका पण तू समोर येताच
माझी वाचाच निघून जाई
शेवटचं एकदा पाहण्यास तुला आलो मी एकदा धावून
मनातला सगळं साठवून तसंच थांबलो तुझी वाट पाहून..
कळलं होतं तू निघून गेलीस कधीच इतकी दूर
बोलणं अपूर्ण राहिला याची मनाला लागत राहिली हूर..
तू समोर येशील याच आशेवर मी नेहमी राहीन
तुला सगळं सांगून मग मी तुझ्यापासून खूप दूर निघून जाईन...
वाटलं नव्हतं कधी तू सोबत असताना तुला एवढ्या जवळून पाहीन
तुझी निवड जरी नसलो तरी आवड मात्र मीच राहीन...

