कधीतरी हसशील ना तू
कधीतरी हसशील ना तू
चष्म्याच्या मागे जे डोळे आहेत
त्यांना कधी काजळ लावशील तू..
नाजुक्ष्या कानावरील लटेला सावरून
तो मार्केट मधून घेतलेला झुमका घालशील तू..
तसं साधी भोळी आहेस दिसायला
पण रागात चावा घ्यायला धावशील तू..
वाटेला तुझ्या मी नाही आडवा येणार
नाहीतर माझ्याच डोक्यात काहीतरी घालशील तू..
कधी कुसकी कधी सौम्य
कधी प्रेमळ तर कधी कटाक्ष तू..
सगळं समोर दिस्तानाही प्रेम नाही दिसले तुला
सगळ्यांना कळलं तरी का नव्हतीस चाणाक्ष तू..
समोर असताना कधी बोलली नाहीस
आता मात्र माझी कळ प्रेमाने काढत्येस तू..
केवडा ठाकूर सारखा मात्र माझ्या गाडीत
जेहेरवाली खीरचा डब्बा तर नाही ना ठेवशील तू..
तुला एक नजर पाहण्यासाठी मी नेहमी झुरत राहिलो
कधीतरी मला सुधा लाडात येऊन पाहशील ना तू..
कितीही कुस्केपणा असला अंगात तुझ्या
फक्त एकदा माझ्याकडे पाहून हसशील ना तू..

