राहून गेलं...(भाग १)
राहून गेलं...(भाग १)
धपकन प्रेमात पडताना
तिला प्रेमात पाडायचं राहून गेलं...
तोंड दुखे पर्यंत बडबडताना
हवं ते सांगायचं राहून गेलं...
ती हो म्हणेल की नाही म्हणेल हा अशुभ विचार करता करता
हवं ते घडायचं राहून गेलं...
नुसतंच बघत बसे मी तिच्या काळ्याभोर डोळ्यांमध्ये
तिच्या डोळ्यांमध्ये स्वतःला शोधताना
माझ्याविना तिचं अडायचं राहून गेलं...
स्वतः बदललो मी तिच्या हट्ट खाती
मनात तिच्या काय आहे हे जाणून घ्यायचं राहून गेलं...
तिच्यावर नकळत केलेल्या प्रेमाबद्दल सांगताना
तिच्यावर प्रेम करायचं राहून गेलं...
त्या भेटीनंतर ती जाताना घालमेल जीवाची असाह्य होई
त्या दिवशी सुधा ती निघाली
पण तिला अडवायचच राहून गेलं...

