STORYMIRROR

Kaustubh Wadate

Inspirational Classics

2  

Kaustubh Wadate

Inspirational Classics

आज मला..

आज मला..

1 min
14.1K


आज मला पक्षी होऊन आकाशात उडायचंय,

आशेच्या पंखांसवे आभाळात उंच उंच जायचंय,

आज मला पक्षी होऊन आकाशात उडायचंय..

सारे दिन निराशेत फुकट गेले,

बंद खोलीत गुदमरून श्वास मेले,

त्याच बंद खोलीचे दार तोडून टाकायचंय,

आज मला पक्षी होऊन आकाशात उडायचंय..

रस्त्यात माझ्या काटेच काटे रचलेले,

दोन्ही पायांतून रक्त येईपर्यंत टोचलेले,

त्याच काट्यांना चिरडून पुढेच धावायचंय,

आज मला पक्षी होऊन आकाशात उडायचयं..

लोकांनी मला शब्दांनी खूप मारले,

माझ्या मनात अपयशाचं बीज पेरले,

त्याच लोकांना आज यश काय हे दाखवायचंय,

आज मला पक्षी होऊन आकाशात उडायचयं..

आज मी खूप उडणार, आकाशाला स्पर्श करणार,

यशाच्या ता-यांना तोडून जमिनीवर आणणार,

अाता मरणं विसरून फक्त जगायचंय,

आज मला पक्षी होऊन आकाशात उडायचयं..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational