Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Sarika Jinturkar

Classics

3.9  

Sarika Jinturkar

Classics

आई

आई

1 min
550


 'आई 'या फक्त दोन अक्षरी शब्दातच विश्वाला गवसणी घालणारे अतूट नाते 

मानवासह पशू पक्ष्यांनाही सुखावून वेडावून टाकणारे


 किती माया, ममता दडलेली आहे 'आई 'या शब्दांमध्ये ... 

आपल्याला जन्म देऊन 

या जगात आणणारी 

आई, एखाद्या देवाचेच रूप तर नाही..

आईमुळेच असते 

आपले अस्तित्व 

आईमुळे मिळते घरालाही पूर्णत्व

'आई' एक मायेचा पाझर ,

तिची माया असते एक आनंदाचा सागर ...  

 *आई* 

आभाळभर माया आणि निस्वार्थ प्रेम करणारी

 न बोलताच मनातलं सगळं काही समजणारी  

कल्पवृक्षाप्रमाणे सावली देणारी 

खचलेल्या मनास स्वअस्तित्वाची जाणीव करून देणारी 


प्रत्येक चूक सांभाळून घेणारी 

मायेची ऊब नेहमी तिची हवीहवीशी वाटणारी


प्रपंचाच्या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पेलीत आपल्याला ममतेने वाढवणारी

आजारपण, अभ्यास इ. सर्व नेहमी तत्परतेने सांभाळणारी

 आईच्या हातची चव तर 

साक्षात अन्नपूर्णा 

 बेत कोणताही असो येणाऱ्यांना ही देते आपलेपणा 

"अतिथी देवो भव" उक्तीला करित असते ती नेहमी सार्थ 

कुटुंबातील सर्व होतात तिच्यामुळे संतुष्ट 

 कुटुंबातील सर्वांसाठी करते ती आपले सर्व काही अर्पण 

स्वतःसाठी कधीच 

काही करत नाही

 कसे करते एवढे समर्पण..?  


 *आई* बद्दल काय लिहावे..?

मायेला तिच्या तुलनाच नाही 

लिहिता लिहिता 

अपुरी पडेल शाई 

परंतु आईचा महिमा लिहल्या जाणार नाही..


Rate this content
Log in