आई
आई
आई असते शिल्पकार ,
मन तिचे मोठे फार ,
जीवनला देते आकार ,
स्वत: होऊन कलाकार . || १ ||
आई संकटात साथ देते ,
लढण्यास बळ देते ,
जगण्याची दिशा देते ,
जीवनाला अर्थ देते . ||२||
नव मास सांभाळून ,
लेकरास संस्कार देऊन ,
आई गुर
ू बनून ,
जाते शिदोरी देऊन . || ३ ||
आई असते विधाता ,
ज्ञानाची तिच दाता ,
स्वत: खाऊन खास्ता ,
लेकरासाठी बनते सुखकर्ता . || ४ ||
आई शिवाय जीवन वाटे ,
निराशमय काटेकुटे ,
जीवनही वाटे खोटे खोटे ,
तुझ्यासमोर नभ ठेंगणे वाटे . || ५ ||