माझे गुरूजी
माझे गुरूजी


आई सम वाटे मज ,
वात्सल्यमय शिक्षक ,
देई संकटात धीर ,
होऊन ढाल रक्षक . || १||
देई संस्कार शिदोरी ,
होऊन निस्वार्थी दाता ,
अंधारात वाट दावी ,
स्वत: होऊन विधाता . || २ ||
उपासक हा ज्ञानाचा ,
ज्ञानदान करी शिष्या ,
बोट धरून शिकवी ,
घाली पाया शिक्षणाचा . || ३ ||
जगण्याची दिशा दावी ,
जीवनाला आकार देई ,
समाजालाही घडवी ,
गोळ्यास आकार देई . || ४ ||
स्वत: खाऊन रे खास्ता ,
शिष्या करी रे महान ,
पाय ठेवून मातीत ,
निर्माण करी सुजन . || ५ ||
संकटसमयी मज ,
आठवतात गुरुजी ,
सुमार्गाने जा लेकरा ,
धीर देतात गुरुजी . || ६ ||