आठवणी आईच्या
आठवणी आईच्या

1 min

82
आई माझी किती परोपकारी,
नाही तिच्या मनी विकारी,
प्रेमाची न संपणारी घागर,
म्हणजे माझी आई//१//
आई थोर तुझे उपकार,
दिला जीवनी या आधार,
सांग फेडू कसे उपकार,
जीवनभर मी तुझीच कर्जदार//२//
देवास सांगेन मी वारंवार,
दे आईस माझ्या आयुष्य भरदार,
माझेच आयुष्य लाभो आईस माझ्या,
नाही विसरणार उपकार तुझे आयुष्यभर//३//
जीवनाच्या अखेरच्या क्षणी,
जीव म्हणेल फक्त आई आई अन् आई,
स्वर्गाला जोडणारा दुवा म्हणजे आई,
जीव झाला सैरभैर पाहण्या तुझं आई//४//