||खरा धनवान ||
||खरा धनवान ||
खरा धनवान तोच,
इतरांना सुखावतो,
गोड भाषा बोलूनिया,
मन साऱ्यांचे जिंकतो||१||
खरा धनवान तोच,
निस्वार्थीपणे धावतो,
इतरांच्या मदतीला,
हृदयातून साथ देतो||२||
नाही विचार धनाचा,
मनी सद्भाव घेऊन,
सेवा करतो जनाची,
तो जातो धनी होऊन||३||
जागा होय रे मानवा,
समाधानी तोच सुखी,
नको धावू धनापायी,
हो माणुसकीने सुखी||४||