आई
आई
_________________________
आई तुझ्या ग विश्वात
मन मोकळं आकाश
लाड मी करायच
लाड तु पुरवायचं !!
लडपड मज होताच
जीव तुझं हंबरायचं
जवळ घेतं लडिवाळ
मायेन तें कुरुवाळण !!
जखम मला होयाची
हृदय तुज तड्फडायचं
असं किती सार जीव
सदा मजसाठी ओतलेलं !!
दुःख सोसत स्वतः
आम्हा वाढवले सुखात
असं आई सदा तुझं
निःस्वार्थ प्रेम ओथंबलेलं !!
आई तु गुरु पाया मज
जगाची पहिली ओळखं
तुज सारखं कुणी नाही
प्रेम जगी दुसरं रूप !!
आई तु एक किनारं
गारवा घेऊन बसलेलं
ऊब देऊन मायेची
मन साकारते जगण्यास !!
_________________________
