STORYMIRROR

Anju Metkar

Tragedy

3  

Anju Metkar

Tragedy

आई

आई

1 min
214

नात्यांच्या सागरी या

पोरकाच असे उभा मी

जलावेगळी मासोळीअसा 

तुजविन तळमळे मी।।१।।


सारेच प्राप्य जगी

एक तुजविन आई

वात्सल्य कोड माझे

जगी कोण पुुुरवेल आई?।।२।।


अभाग्याहून मी अभागी

नाही तुझा प्रेेेम आसरा

 या वंचितास माते 

देईल कोण थारा ?।।३।।


आठवांचा तव येेता पूूूर

नेत्र झरतात निरंंतर

मनीमानसी नित काहूर

भेटीस्तव तुुझ्या जीव आतुर।।४।।


राहून सदा निर्जला उपाशी

चारली मज मीठभाकर तुुुपाशी

कवटाळून मज ह्रदयाशी 

क्षमा केेलीस तू अहर्निशी ।।५।।


ममत्व तव जशी मलई

अथांग सागराची दुलई

घेई कवेेतं मज आई

पांंघरुन नभ निळाई ।।६।।


आधारवड तू मम माऊली

पोरक्यास देे वात्सल्य सावली

परतून येे सत्वरी गाऊली

वासरास तव मायेची चाहूली ।।७।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy