STORYMIRROR

Shobha Wagle

Inspirational

3  

Shobha Wagle

Inspirational

आई दैवत

आई दैवत

1 min
336

आई माझे दैवत, ऋण तिचे माझ्यापाशी

अर्पिते पुष्प ओंजळ तुझ्या चरणापाशी.


संस्कारांचे बीज पेरुनी मज घडविले

सत्कर्म धडे माझ्याकडून गिरविले. 


आई बाबांनी अपार कष्टांनी वाढविले

ज्ञानी शिक्षित छान नागरिक बनविले.


कर्तव्यपूर्ती केली आई बाबांनी तयांची

आली वेळ आमची त्यांची काळजी घेण्याची.


म्हातारपणी सुखात ठेवू आई बाबांना

सेवा तयांची करणे पुण्य मिळे सर्वांना.!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational