आहो
आहो
तुझं आहो म्हणण्यात
किती गोडवा असतो
तुझा आहो म्हणण्याचा
लडिवाळा
माझ्या काळजाला भिडतो
खर सांंगतो तू आहो
म्हटल्याशिवाय
तुझं जगण सुरू होत नाही
आणि आहो एकल्याशिवाय
मी पूर्ण होत नाही
आहो म्हणायला
तू कंटाळा कधी करत नाही
स्वतःपासून या आहोला
वेगळ होवू देत नाही
प्रत्येक वटपौर्णिमेला
या आहोसाठी एक प्रदक्षणा
जास्तच घातेेेस
प्रत्येक जन्मी याच आहोला मागतेस
खरच तुुु्झ्या हृदयाच्या कुपीत
या आहोला किती जपून ठेवते
अलगद कवेत घेताना
डोळे भरून बघतेस
