आग आगीला लावा
आग आगीला लावा


दमदार हजेरी आज दिली पावसानं.
जणू देव पावला मला कितीक दिवसांन.
झोंबटो गारवा ऊब मला हो द्यावा.
अहो राया, तुम्ही आज रातीला रहावा.
तुम्ही आज रातीला.........
.
आवडेल मजला तुमची गुलाबी साथ.
जन्म भरी राहू द्या ध्यानी ओली रात.
ठेवीन भरुनी कुपी त मनाच्या
हा गुल कंदी ठेवा (१)
य
ा राकट हातांनी घाला विळखा मला.
तुमच्या मिठीत शिकवा शिंगारा ची कला
इश्क बााजीची उधळण करूनी
रंगवा रात ही रावा (२).
मध्यान रातीला उगल दिस अपुला
झोपू या पहाटे गळ्यात घालुनी गळा.
जवानीच्या होऊ द्या कहर साजना.
आग आगीला लावा .
राया तुम्ही आज रातीला रहावा........