STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Children

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Children

आदर

आदर

1 min
208

जन्मदात्यांचा आदर

नित्यनेमाने करावे

सत्कर्म करूनिया

सदा गुरूस स्मरावे....!!


दाखवली दिशा ज्यांनी

करावा त्यांचा आदर

बाप आधारवड घराचा

माय वात्सल्याची चादर...!!


मित्रमंडळीचा सदा

मनातून आदर करावा

कुणी संकटात सापडता

हात मदतीचा धरावा.....!!


गरिबीची भूक मोठी

भुकेला तहानेला ओळखावा

देव भक्तीचा भुकेला

देव माणसांत दिसावा....!!


करा बहिणीची कदर

थोरामोठ्यांना घरी मान

सानथोरांसमोर एक आदर्श

वाढवी घराची ती शान....!!


प्रत्येक स्त्री मातेसमान

जिजाऊंची शिकवण

घडले आदर्श शिवराय

स्वराज्यासाठी अर्पिले तन मन धन.....!!


ठेवा साधुसंतांचा आदर

नका मानू जातीधर्म

माणसातली माणुसकी

खरे जीवनाचे ते मर्म....!!


करा सैनिकांचा आदर

घडे तीही एक देशसेवा

एकमेका सहाय्य करू

अंगी बाणूआपुलकीचा ठेवा...!!


कन्या येती घरा ज्याच्या

दिन भाग्याचा तोच खरा

काळजाची कळी तुमच्या

मनापासून आदर करा.....!!


लाख येता संकटे जीवनी

वाहू दे आपुलकीचा झरा

काळजाच्या कप्प्यातून

गड्या सर्वांचा आदर करा...!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational