आदिशक्ती
आदिशक्ती
तू गं दुर्गा तू भवानी
तू आदिमाया आदिशक्ती
नवरात्री सकल वंदितो
पहा उपासनेची भक्ती.
घट पूजनाने करतो सुरुवात
नऊ दिवस ठेवतो उपवास
नंदादीप नऊ दिन तो तेवतो
प्रसन्न व्हावे अशी एक आस.
फुलमाळांच्या शृंगाराने पुजितो
मखरात देवी बसुनी झुलवितो
दिव्य तेजोमय देवीची मूर्ती पाहुन
जीव सकलांचा तो सुखावतो.
खण नारळाने ओटी भरतो
रास गरबा मधुर गाणी गातो
ताल सुरांवर फेर धरुनी नाचत
दुर्गे भोवताली गरबा खेळतो.
तू गं दुर्गा तू भवानी
सकल जनाची आदिमाया
तुझ्याच कृपेची सदा असावी
भक्तजनांवर सतत माया.
