STORYMIRROR

Prem Gaikwad

Abstract Action

2  

Prem Gaikwad

Abstract Action

आधी वंदन तुला...

आधी वंदन तुला...

1 min
59

पेटवून ज्ञान ज्योत

प्रकाश आम्हा दिला,

हे क्रांती महात्म्या

आधी वंदन तुला....


तुझ्यामुळेच इथे हा

ज्ञान सूर्य उगवला,

शिक्षणाचा पायाच खरा

तुच प्रथम रोवला.,

अज्ञानाचा अंधार तो

तूच खरा दूर केला...


अस्पृश्यता, जातीयता

मिटविला कलंक,

ज्ञानदीप पेटवून

केला अज्ञानाचा अंत.,

तुझ्यामुळे दीन दुबळ्यांचा

उध्दार खरा झाला..


सत्यशोधक तू

दिला आसूड शेतकऱ्यास,

केली महान समाजसेवा

दिला न्याय स्त्रीयास.,

जनकल्याणार्थ ज्योती

उदार जीवावर झाला..


क्रांती केली खरी

उघडले ज्ञानाचे द्वार,

केले कार्य महान

कसे फिटतील उपकार,

करु वंदन कोटी कोटी

ज्योती, सावित्रीला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract